राजकीय
महायुती सग्रामात लोकसभेची निवडणूक कोण लढणार?
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय

भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात सामना होत राहिला आहे. राज्यात पक्षा अंतर्गत फुट पडुन वेगवेगळे गट पडुन पक्ष्याअंतर्गत एक-मेकमेकाची मतें घेऊन पक्ष कमकुवत होण्याचा निदर्शनास येत आहे त्यामध्ये राका नेता (प्रफुल्लभाई पटेल), परिणय फुके, खा. सुनील मेंढे व काग्रेस नेते नाना पटोले , मोहन पंचभाई यांची नावे समोर येत आहे.पण काग्रेस पक्षात तसे काही च नाही उमेदवार ठरवलेला आहे पण गोपनिय! मागील वर्षभरात सर्वच पक्ष्यातिल नेत्यांनी लोकसभा ची निवडणूक लक्षात घेऊन राजकीय नेत्यांनी भंडारा-गोंदिया जिल्हात सभा, संमेलनात सहभागी होऊन जनतेशी संवाद साधला. भंडारा क्षेत्रात भाजप व काग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले.

संविधान निर्माते डॉ. भिमराव रामजी आंबेडकर महापुरुष व श्रीकांत जिचकार सारखे विद्वान पुरुष सुध्दा ह्याच भंडारा लोकसभा क्षेत्रातुन पराभुत झाले.
आता भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची बागडोर कोणत्या नेत्याच्या हाती जाते हा येणारा काळ सांगेल!

