राजकीय
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा जनता दरबार…
विकास कामाबाबत थेट मार्गदर्शन…
भंडारा जिल्हा वार्ता:-महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म तसेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा येथील पोलीस बहुउद्देशीय सभागृह पोलीस मुख्यालय भंडारा ईथे जनता दरबार 21 सप्टेंबर 2025 सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील नागरिकांच्या अडीअडचणी मागण्या आणि विकास योजना थेट आपल्या लोकप्रतिनिधी समोर मांडण्याची उत्तम संधी आहे.

या जनता दरबारात विविध शासकीय योजनेबाबत माहिती, वैयक्तिक व सामुहिक समस्या व विकास कामाबद्दल थेट मार्गदर्शन मिळणार असे आशु गोंडाणे अध्यक्ष भाजपा भंडारा जिल्हा यांनी आव्हान केले.