क्राइम
अवैध दारू विक्रेत्यांवर पोलीसांची कडक कारवाई…
तिन जिल्हयातुन हद्दपार
सिहोरा वार्ता:-तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस स्टेशन चे अधिकाऱ्यांने अवैध मोहफुल दारू विकणारा आरोपी संजय खरोले रा. रुपेरा याला महा. पोलीस ॲक्ट 56(ब) कायदा अंतर्गत भंडारा ,गोंदिया आणि नागपूर ह्या तिन्ही जिल्ह्यातुन बाहेर हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात सिहोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजय कसोधन केली.



