क्राइम
अवैध रेती वाहतूकीवर कार्यवाही…

भंडारा/साकोली वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलीस स्टेशन चे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना मौजा कुंभली ते मोहपाटा रोडवर अवैध रितीने रेती चोरुन वाहतूक करणाऱ्या आरोपी १) पिऊस निंबेकर रा. सेंदुरवाफा २) श्रीराम निंबेकर रा. सेंदुरवाफा याच्या ताब्यातील ट्रक्टर व एक ब्रास अवैध रेती ज्याची एकुण किंमत १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात साकोली पोलीस स्टेशन चे अधिकारी करीत आहेत.



