क्राइम
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर पोलीसांची कार्यवाही…

लाखनी वार्ता:-
भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशन चे कर्मचारी स्टापसह पेट्रोलिंग करीत असताना मौजा धोबेटेकडी शिवारात फरार आरोपी चालक योगराज दोनाळे रा. मेंढा , मालक उमेश गभने रा. गुरढा यांच्या ताब्यातील स्वराज कंपनी च्या ट्रक्टर मध्ये स्वतः च्या फायद्या करीता बिना पास परवान्याने अवैध रेती चोरुन वाहतूक करतांना मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातील अंदाजे ट्रॅक्टर ,ट्राली आणि एक ब्रास रेती यांची एकुण किंमत ९ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही
पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, लाखनी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे
यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस हवा. प्रभा कुलसुंगे यांनी केली असून पुढील तपास लाखनी पोलीस स्टेशन चे अधिकारी करीत आहेत.



