कु.शुभांगी पटले आणि कु. मिनल पुंडे मराठी विषयात भंडारा जिल्ह्यात प्रथम
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार
नुकताच एच .एस .सी .बोर्डाचा निकाल जाहीर झाला. यात अनेक विद्यार्थ्यांनी नैपुण्य गुण प्राप्त केले. या निकालात संपूर्ण भंडारा जिल्ह्यातून कु. शुभांगी पटले व कु. मिनल पुंडे या न. प.नेहरू कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथील विद्यार्थिनींने मराठी विषयात 100 पैकी 94 गुण प्राप्त करून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी प्रा. संजय लेनगुरे यांनी कु. शुभांगी आणि कु.मिनल यांचे, त्यांच्या खेड्यातील निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक प्रगती करिता शुभेच्छा दिल्या.
*मराठी ही मातृभाषा असून या विषयात विद्यार्थ्यांनी नैपुण्य गुण प्राप्त करने काहीच कठीण नाही. हे कु. शुभांगी पटले आणि कु.मिनल पुंडे यांनी सिद्ध केलेले आहे. *न. प. नेहरू कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथील या विद्यार्थिनी* असून प्रा. संजय लेनगुरे यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांना लाभले
*आहे. *याच कनिष्ठ* महाविद्यालयातील कु. सोनाली लाडसे व कु.साक्षी गौपाले यांनी मराठी विषयात 92 गुण मिळवून महाविद्यालयातून मराठी विषयात द्वितीय ठरल्या, तसेच. कु. आराधना चुधरे हिने 91 गुण घेऊन मराठी विषयात तृतीय ठरली.. एवढेच नाही तर.. कु. रजनी बिटलाये, कु.प्राजक्ता बोरकर या दोन्ही विद्यार्थ्यांनी मराठी विषयात 100 पैकी 90 गुण प्राप्त केले.
तसेच जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत मराठी या विषयात ९० च्या वर गुण प्राप्त केलेले आहेत.
मागील दोन वर्षापासून महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ, संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेच्या समृद्धीसाठी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सतत *प्रयत्नशील आहे. मराठी *विषयाच्या प्राध्यापकां*
सोबतच विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन या संघटने मार्फत सातत्याने केले जाते. याचीच फलश्रुती म्हणून आज महाराष्ट्रात बारावीच्या निकालात मराठी विषयाच्या निकालानी उच्चांक गाठला आहे. ही या संघटनेसाठी व मराठी विषयासाठी फार मोठी गौरवाची बाब आहे.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.सुनील डिसले सर, सचिव प्रा.बाळासाहेब माने, कार्याध्यक्ष प्रा.संपतराव गर्जे, प्रशासकीय अधिकारी श्री. देवानंद सावके प्राचार्य भारत थोटे, श्री. रमेश बोंद्रे, श्री. चंद्रकांत भट, श्री. मनोहर देशमुख. श्री. सतीश बडवाईक, सौ कल्पना मलेवार सौं. नलिनी धुर्वे, श्री.मंगेश ढोके, श्री.अविनाश गजबे, श्री. अलोक गुप्ता, श्री. सोमा गायकवार, श्री. राजेंद्र ढेकवार, श्री. प्रदीप ठाकरे सर श्री.अजय यादव, यांनी सर्व मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले… तसेच मराठी विषयाची राज्य कार्यकारिणी, संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुका कार्यकारिणी कडून गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
स्वार्थी करमकर
न्यूज रिपोर्टर
पोलीस की आवाज
महीला प्रतिनिधी


पोलीस की आवाज डिजिटल वृत्तपत्राचे कार्य उत्तम रित्या सुरळीत सुरू आहे…. करिता खूप खूप धन्यवाद…