LCB ची अवैध रेती वर कार्यवाही…

तुमसर पोलीस स्टेशन ची घटना
भंडारा वार्ता:-तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा डोंगरला येथे स्थानीक गुन्हे शाखेचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना दोन ट्रॅक्टर बिना परवान्याने अवैध रेती वाहतूक करतांना मिळुन आले.हे ट्रॅक्टर नामे रवीन्द्र पटले व विजय पटले हे दोन्ही डोंगरला गावातील असुन यांच्या ताब्यातून रेती आणि ट्रॅक्टर ची किंमत 14 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा नोंद करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी यांच्या सोबत मिटेवानी ईथे बार समोर मारहाण झाल्याची बातमी समोर आली ते कर्मचारी गंभीर जखमी पण झाले परंतु नेमकी कोणत्या कारणास्तव मारहाण झाली हे काही अद्याप कळलेलं नाही.

LCB भंडारा च्या कार्यवाही मुळे तुमसर पोलीस स्टेशन मधिल घटना चर्चेचा विषय बनलेला आहे. तुमसर पोलीस स्टेशन स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यांनी अवैध रेती वाहतूकी वर जास्त प्रमाणात कार्यवाही करणे ही काळाची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.मा.पोलीस अधीक्षक भंडारा यांनी ह्या विषयाकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.