अवैध रेती वर जवाहरनगर पोलीसांची कार्यवाही…

5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…
जवाहरनगर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशन चे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना मौजा पारसोडी येथे चालक विनोद लेंडे रा. राजे दहेगाव यांच्या ताब्यातील सोनोलिका ट्रॅक्टर मध्ये सुर नाल्यातुन एक ब्रास रेती अवैध रुपाने वाहतूक करतांना आढळले तसेच रेती वाहतुकीचा बिना परवान्याने अवैध उपसा करून मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर अंदाजे किंमत 5 लाख व रेती 5 हजार 500 रु. असा एकुण 5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले व आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही
पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व जवाहरनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात पोहवा वरकडे, पोशि हाके

पोलीस स्टेशन जवाहरनगर यांनी केली.
पुढील तपास जवाहरनगर पोलीस स्टेशन चे अधिकारी करीत आहेत.