ड्रग्ज विरोधात मोठी कार्यवाही…

223 गांजा व ब्राऊन शुगर नष्ट…
भंडारा वार्ता:-भंडारा जिल्हा पोलीसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून अनेक पोलीस स्टेशन अंतर्गत जप्त केलेल्या अवैध अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्याची मोठी कार्यवाही करण्यात आली.
पोलीस अधीक्षक नुरुल हसन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती आणि सरकारी पंच यांच्या समक्ष जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थांमध्ये 22.98कि.ग्रा.गांजा व 2 ग्रा. 160 मिली ग्राम ब्राऊन शुगर मोजमाप करून नष्ट करण्यात आले.

या समितीमध्ये अपर पोलीस पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर मयंक माधव, तहसीलदार भंडारा आनंद हटवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष बारसे, स्था. गु. शाखा पोलीस निरीक्षक नितीशकुमार चिंचोलकर आणि लिगल मेट्रोलॉजी ऑफिस च्या अंजली कोहरु यांचा सहभाग होता.

सदर ची कार्यवाही
पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोनि. चिचोंलकर
यांच्या मार्गदर्शनात सपोनि पुंजरवाढ, पोहवा रमेश बेदुरकर, विजय राऊत, पोअ जगदीश श्रावनकर, योगेश पेठे, क्रुणाल कडव एनडीपीसी पथक स्था.गु.शा. भंडारा यांनी केली.



