अधिकारी आहो हे सांगुन फसवणूक करणाऱ्या आरोपी ला अटक…

तुमसर वार्ता:-तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या घटनेचा सविस्तर वृत्त असे की शिवाजी नगर तुमसर येथील रहिवासी हरिशंकर रामलखन चौबे सेवानिवृत्त फोरमॅन चिखला मॉईल यांच्या सोबत झालेल्या फसवणुकीमध्ये घटना उघडकीस आली आहे.
हरीशकंर चौबे यांना त्यांच्या मोबाईल वर एक अनोळखी ईसमाचा फोन📱 आला मै अभिराज शुक्ला आय नं. 51773 टेलीकॉम रेगुलेटरी आरथोरेटी ऑफ इंडिया से बात कर रहा हु असे बोलुन तुम्ही सिम कार्ड मुंबई ने खरेदी केली व ह्या नंबर ने अश्लिल फोटो टाकले आणि नरेश गोयल मनी लॉडरिंग केशमध्ये सामिल आहात असे बोलुन आपल्या खात्याची लेनदेन बरोबर नसुन आपल्या खात्याची चौकशी करावी लागेल असे बोलुन मी सरकारी अधिकारी आहे असा विश्वास बसवला यावर हरीशकंर चौबे यांनी बॅकेत जाऊन 7 लाख 50 हजार 720 रु. RTGS केला आणि पुन्हा चौबे यांनी गौरव नावाच्या खात्यामध्ये 13 लाख 10 हजार 600 रुपयांचा RTGS केला असा एकुण 20 लाख 61 हजार 320 रु. चा हरीशकंर चौबे यांना अनोळखी ईसमाने त्यांची फसवणूक केली .हा सर्व प्रकार लक्षात आल्याने त्यांनी त्यांच्या मुलगा राजेश चौबे याला सांगितल्यावर त्यांनी पोलीस स्टेशन तुमसर येथे तक्रार केली.
पोलीस स्टेशन तुमसर चे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी तात्काळ सायबर पोलीसांच्या मदतीने फसवणूक करणाऱ्या व मालविय नावाच्या खात्याची तपासणी केली असता तो मध्यप्रदेश राज्यातील गाव भानपुरा जिल्हा मनसौर येथील आरोपी असल्याचे समजले त्यांनी टीम तयार करून पाठविले व आरोपी ला पकडले.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे , उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनात तुमसर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड सायबर पोलीस निरीक्षक, पोउपनी प्रविण सयाम तसेच डीबी पथक पोशि तिलक चौधरी व पोलीस स्टेशन चे अधिकारी कर्मचारी करीत आहेत.



