सामाजिक
आदिवासी गोवारी शहीदांना श्रधाजंली…

तुमसर वार्ता:-२३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर च्या झिरो माइल वर बलीदान दिलेल्या ११४ आदिवासी गोवारी शहीदांसाठी श्रद्वाजंली चा कार्यक्रम नाकाडोंगरी येथे पार पडला.

या कार्यक्रमात सकाळ पासून ढोल तास्याच्या गजराने पारंपरिक पोशाखात समाज बांधवांने गावात रैली काढण्यात आली त्यानंतर शहीद स्मारक ठिकाणी ध्वज वंदना घेऊन श्रद्वाजंली देण्यात आली.

ह्या कार्यक्रमाला उपस्थित गोंड-गोवारी-समाज समिती चे उपाध्यक्ष अविनाश सोनवाने, नामदेव ठाकरे, महेश्वरी नेवारे, सुमित गौपाले (सरपंच) , विजय राऊत ( उपसरपंच),गोल्डी घडले,देवेन्द्र मानकर, डॉ. सचिन बावनकर,मुरली सोनवाने( नागपूर) राजेश वाघमारे, अमित शहारे, शामु मुर्खे, शाम राऊत, कन्नेया कोहळे आदी समाज बांधव उपस्थित होते.



