प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेची महत्त्वाची मीटिंग संपन्न

पालांदुर वार्ता:-
दिनांक- २१ नोव्हेंबर २०२५ , रोज शुक्रवारला, स्थळ- विश्रामगृह भंडारा येथे दुपारी- २.०० वाजता प्रहार अपंग क्रांति आंदोलन संघटना भंडारा जिल्हा ची नियोजन बैठक भंडारा जिल्ह्यातील प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या प्रमुख जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, शहर प्रमुख यांची नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकी मध्ये दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दिनांक ०३ डिसेंबर २०२५ रोज- बुधवारला, सिद्ध साक्षी महाराज आनंदधाम किटाळी( बरडकिन्ही), ता. साकोली, जिल्हा भंडारा येथे “जागतिक दिव्यांग दिन” साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.०० वाजता चहा, नाश्ता मिळणार आहे. त्या नंतर सर्व प्रथम दिव्यांग बंधू भगिनी यांचा वधू वर परिचय मेळावा, आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर, रोजगार नोंदणी मेळावा, आनि आलेल्या दिव्यागांना ब्लँकेटचे वाटप होणार आहे. नंतर अल्पोपाहार आनि मग सर्वांचे प्रस्थान
असे संपूर्ण नियोजन करण्यात आले. बैठकीला प्रहार अपंग क्रांति आंदोलन संघटना भंडारा जिल्हा अध्यक्ष रवी मने, जिल्हा सचिव योगेश्वर घाटबांधे, प्रशांत शिवणकर, साधना भुरे, गिरधारी मेहर, चंद्रशेखर दुरुगकर, राधेश्याम मेश्राम, पिंटू पटले, रोशन वंजारी, श्रीहरी भोंगाडे, नितीन बोपचे, विनोद चोपकर, शिवदास वाहणे, राजू नेवारे, सुनील कहालकर उपस्थित होते.




