क्राइम
अवैध रेती वाहतूकीवर कार्यवाही…

मोहाळी वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील मोहाळी पोलीस स्टेशन चे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना रोहा तह. मोहाळी येथील आरोपी रवींद्र केवट, अभिषेक सपाटे व मालक राजेन्द्र चकोटे याचा ताब्यातुन दोन ट्रक्टर ला जोडलेल्या दोन ट्रॉली मध्ये दोन ब्रास रेती अवैध रितीने बिना परवान्याने वाहतूक करतांना मिळुन आल्याने त्याच्या ताब्यातील रेती व ट्रक्टर ची अंदाजे किंमत १२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सदर गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, व मोहाळी स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेन्द्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात पोहवा लांडगे, पोहवा भुरे पोलीस स्टेशन मोहाळी चे कर्मचारी करीत आहेत.



