देश
डोंगरी बुजुर्ग खदान मध्ये सुरक्षा सप्ताह चा आयोजन…

गोबरवाही वार्ता:-तुमसर तालुक्यातील डोंगरी बुजुर्ग खदान येथे वार्षिक सुरक्षा सप्ताह चा आयोजन करण्यात आला.
ह्या कार्यक्रमात खदान व्यवस्थापक सुधीर पाठक
यांनी अधिकारी आणि कामगारांना संबोधले की खानी मध्ये उत्पादन वाढविण्याच्या साथोसाथ कामगारांची सुरक्षाही अत्यंत गरजेची आहे. ह्या कार्यक्रमात मॉईल हिंदी शाळेच्या विद्यार्थ्यांनाही सुरक्षा संबंधित मार्गदर्शन करण्यात आले. पश्चिमी झोन मधुन आलेल्या निरीक्षकांनी खदान सुरक्षा वर आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा देण्याच्या प्राथमिकतेला आव्हान केले.
ह्या कार्यक्रमात मॉईल चे अधिकारी, कर्मचारी व शाळेकरी विद्यार्थी उपस्थित होते.



