पोलीस दलामार्फत रन फॉर युनीटी आणि” वॉक फॉर युनीटी ” कार्यक्रम

भंडारा वार्ता:-भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे *सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त *वॉक फॉर युनीट* आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम पोलीस मुख्यालय मैदानात घेण्यात आला. *वॉक फॉर युनीटी* सुरू होण्यापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत *सरदार वल्लभभाई पटेल* यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले तसेच राष्ट्रीय एकात्मेची शपथ घेण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा सत्र न्यायाधीश भंडारा श्री. आर. जी. अस्मर यांच्या हस्ते एकता मार्च ला हीरवी झंडी दाखवण्यात आली. तसेच कार्यक्रमात प्रामुख्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मा. नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास काळे तसेच इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांपैकी पाच कि. लो. च्या वाकिंग मध्ये पहिले येणारे दहा पुरुष व महिला विजेत यांना जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. आर. जी. अस्मर, मा.पोलीस अधीक्षक नुरुल हसन व मा. अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन चे सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मुख्य ठिकाणी स्थानिक नागरिक, विद्यार्थी, महिला आणि विविध संस्थांच्या मदतीने *रन फॉर युनीटी* व *वॉक फॉर युनीटी* ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.



