अवैध हातभट्टी दारु वर पोलीसांची कार्यवाही…

साकोली वार्ता:-
भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात दारु,रेती,जुगार असे अनेक धंदे होत असल्याची माहिती पोलीस कि आवाज न्युज ला मिळत आहे. असाच एक प्रकार साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा आमगाव बुजुर्ग च्या शेत शिवारात अवैध हातभट्टी दारु काढतांना मिळुन आल्याने आरोपी डिगंबर ऊके रा. एकोळी यांच्या ताब्यातून सडवा मोहफुल, लोखंडी ड्रम जलावु काळ्या, टीनाचे पिपे असा एकुण 47 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध सदर चा गुन्हा नोंद करून कलम 65(फ) म.दा.का. नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय अधिकारी सिवम विसापुरे

यांच्या मार्गदर्शनात साकोली पोलीस स्टेशन चे अधिकारी कर्मचारी करीत आहेत. आणखी जास्त प्रमाणात कार्यवाही होणे आवश्यक आहे असी चर्चा परीसरात होत आहे



