पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीला आजन्म कारावास व द्रव्य दंडात्मक शिक्षा!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा न्युज नेटवर्क//चॅनल
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क //चॅंनल
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसील अंतर्गत येणाऱ्या गोबरवाही पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या पिपऱ्या गावात राहणाऱे आरोपी नामे शिशुपाल मंगलदास बर्वे यांना पत्नीचा खुन केल्याचे आरोप शिध्द झाल्याने आरोपी ला जिल्हा सत्र न्यायाधीश मान.श्री पी.एस.खुने यांनी आरोपीला आजन्म कारावास व ३०,०००रु.द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली.
सविस्तर माहिती अशी की फिर्यादी राह.आष्टी हिच्या मुलीचे लग्न २००६मध्ये झाले होते.दोन ते तिन वर्ष पतिसोबत राहत होती तिला दोन अपत्ये होते आरोपी दारु पिऊन दारुच्या नशेत घरी पत्नी व मुलांसोबत भांडण करित होता ह्यावरून मृतकाच्या आईने मुलीगी,जावंई व नातवंडांना आपल्या राहत्या आष्टी गावात आणले होते .जावई कोणतेही काम न करत असल्याने व दारु पिण्याची सवय असल्याने तिने जावयाला हकलले.
मृतक शालु हि आपला व मुलांचा भरण पोषण करण्यासाठी आठवडी बाजारात भाजीपाल्याची दुकान लावत होती.

बघेडा गावात १८/०३/२०२१ रोजी आठवडी बाजारात जाऊन धंदा करित असतांना सायंकाळी दुकान बंद करत असतांनी आरोपी शिशुपाल मंगलदास बर्वे यांनी मृतक शालु हिच्या डोक्यावर व मानेवर कुराडीने मारुन जिवानिशी ठार केले व फिर्यादी अडवण्यास गेल्याने तिला खांद्यावर व छातीवर मारुन जखमी केले.असे फिर्यादी ने तोंडी तक्रारीवरून गोबरवाही पोलीस स्टेशन ला सांगितले.सदर गुन्ह्याची दखल घेऊन तत्कालीन ठाणेदार दिपक पाटील यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी ला अटक केली.
Yerli tumsar bandara