क्राइम
मोहफुल दारू वर LCB ची कार्यवाही

भंडारा वार्ता:-भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा मुजबी येथे मिळालेल्या गुप्त माहिती नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना मुजबी शिवारातील नाल्यालगत अवैध हातभट्टी वर धाड मारुन सडवा मोहफुल प्लास्टिक ड्रम, लोखंडी ड्रम अशा विविध साहित्याची एकुण किं. 4 लाख 2 हजार 100 रु. मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी नरविर मेश्राम रा. मुजबी तसेच फरार आरोपी जयपाल बागळे रा. फुलमोगरा यांच्या विरुद्ध कलम 65(फ) म. दा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनात स्था. गु. शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.
