विद्यार्थ्यांनी समजभिमुख शिक्षण घेतले पाहिजे.



मा.श्री.राजेश ऊके(मुख्य संपादक, पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क)द्वारा
विद्यार्थ्यांनी समाजभिमुख शिक्षण घेतले पाहिजे.
. प्रा. सुषमा पाटील कोल्हापूर यांचे प्रतिपादन.
करु या साजरा.. शिक्षक दिन.. ऑनलाइन मार्गदर्शन सत्र संपन्न..!
. विद्यार्थी अभ्यास मंडळाचा अनोखा उपक्रम….!
तुमसर, दि. 4 सप्टेंबर..
. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक जेव्हा शिकवितात तेव्हा ते फळ्यावर सुंदर आणि सुबोध अक्षरे काढतात हेतू काय? तर…विद्यार्थ्यांनी आपले जीवनअसेच सुंदर आणि सुबोध केले पाहिजे हीच शिक्षकांची मनस्वी इच्छा असते. शिक्षक जेव्हा एखादा पाठ किंवा प्रकरण वर्गात पोट तिडकीने शिकवितात. जे विद्यार्थी आणि शिक्षक विषयाच्या पलीकडे जाऊन अगदी मन लावून शिकतात किंवा शिकवितात. त्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणाचे महत्त्व कळलेले असते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी समाजभिमुख शिक्षण घेणे काळाची गरज आहे.
तसेच शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता,आशावाद हेच मुलांना जगण्याचे बळ देते. भविष्यात येणाऱ्या संकटावर मात करायची असेल तर विद्यार्थ्यांनी मुळत: उत्तुंगतेची आस धरली पाहिजे. जीवनाकडे बघण्याचा दुर्दम्य आशावाद आणि प्रचंड इच्छाशक्ती असली पाहिजे. तसेच कठोर वास्तव्याला सामोरे जाण्याची जिद्द हवी . शिक्षकांसाठी रोजचा दिवस हा “शिक्षक दिन” असला पाहिजे. तरच चांगले विद्यार्थी घडविले जाऊ शकतात म्हणजेच खऱ्या अर्थाने शिक्षक हा घडणारा आणि घडविणारा असला पाहिजे. असे प्रतिपादन, मेन राजाराम कनिष्ठ महाविद्यालय, कोल्हापूर येथील प्रा. सुषमा पाटील यांनी केले.
स्थानिक विद्यार्थी अभ्यास मंडळ तुमसर, आणि माझी माय सरसोती भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करु या साजरा ” शिक्षक दिन ” या विषयावर ऑनलाईन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. रमेश बोंद्रे प्रमुख अतिथी प्रा. विनोद हटवार भंडारा प्रा.विजया मने,गडचिरोली प्रा.पवन कटरे गोंदिया उपस्थित होते. मार्गदर्शन कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून प्रा संजय लेनगुरे यांनी सतीयुग, प्राचीन, मध्ययुगीन,अर्वाचीन या काळातील अजोड गुरु -शिष्यांची जोडी वर्णन केली.. तसेच विद्यार्थ्यांमध्ये नवीन काहीतरी शिकण्याची जिज्ञासा निर्माण व्हावी याकरिता दैनंदिन अध्यापनासोबतच ऑनलाइन शैक्षणिक उपक्रमाची अत्यंत आवश्यकता आहे. ही या मागची भूमिका आहे. असे मत मांडले.
सदर कार्यक्रमाचे संचालन मुकुल पारधी, कुमकुम मोटघरे यांनी तर आभार रक्षा रहांगडाले, मानसी धारगाये. यांनी मानले.
मार्गदर्शन कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनश्री आकरे, पायल पारधी, आचल खेडकर, पवन जांगळे, सुशांत नागदेवे, आश्लेषा गाळवे नोषनीता बुधे, काजोल उके, गायत्री गुरव, रचिता पारधी, अंजली गिरीपुंजे, रिची चौरे, खुशी बनसोड, त्रिवेणी पटले, सलोनी गोपाले, सलोनी ठवकर, राजश्री पटले, माधुरी बडवाईक, खुशबू बडवाईक, वैष्णवी पटले, समृद्धी कुकडे, चेतना रनभोईर, कांचन बोरकर, स्नेहल तिजारे, उत्कर्षा आगाशे, पार्थ कांबळे, आर्यन गडलिंग इत्यादींनी सहकार्य केले.
स्वार्थी करमकर
न्यूज रिपोर्टर
महिला प्रतिनिधी
पोलिस की आवाज

उत्तम डिजीटल न्युज पेपर आहे…