शालेय

श्री दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय सावडी 14 वर्षे वयोगट मुलींचा संघ तालुक्यात उपविजेतेपद तर 17 वर्षे वयोगट मुलींचा संघ तालुक्यात विजेतेपद

कळमना वार्ता:-दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा व क्रीडा सेवक संचनालय अंतर्गत करमाळा तालुक्यातील शालेय कबड्डी स्पर्धा यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये तालुक्यातील अनेक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे 14, 17 ,19 वयोगट संघ समाविष्ट झाले होते


श्री दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय सावडी या विद्यालयातील 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने तालुकास्तरावर उपविजेतेपद तर 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेतेपद मिळून जिल्हा स्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला या स्पर्धेत दोन्ही संघाच्या खेळाडूंनी अतुलनीय कौशल्य सामंजस्य आणि जिद्दीचे प्रदर्शन करून सर्वत्र प्रशंसा मिळविली
या ऐतिहासिक यशामध्ये खेळाडूंच्या कठोर परिश्रमाबरोबर क्रीडाशिक्षक कांबळे सर, व कन्हेरकर सर, आणि मुख्याध्यापक श्री देशमुख सर, शिंदे सर ,व गवळी सर ,यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण आणि प्रोत्साहन हे होते त्यांनी खेळाडूंमध्ये संघ भावना निर्माण करून त्यांचे सर्वस्वी पाठबळ दिले


विद्यालयाने संघाचे मनापासून अभिनंदन केले संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र जाधव, मुख्याध्यापक देशमुख सर ,सर्व शिक्षक कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी या विजयावर खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या
या यशाने विद्यालयाचे नाव तालुक्यात गौरवाने झळकले आहे संपूर्ण सावडी गाव आणि विद्यालय परिवार या विजयाने अत्यंत आनंदित झाला आहे आणि अभिमानाने भरून गेला आहे खेळाडूंना भविष्यातील सर्व स्पर्धांमध्ये असेच यश मिळवण्यासाठी सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button