क्राइम
अवैध रेती वाहतुक करणारा टीप्पर पोलीसांच्या ताब्यात…
लाखनी पोलीस स्टेशन ची कामगिरी…
लाखनी वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा मुंडीपार किटाळी रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाचा अशोक ले ल्यांन्ड कंपनी चा टीप्पर क्रमांक MH-36-AA3669 मध्ये अंदाजे 5 ब्रास रेती भरून अवैधरित्या बिना परवाना रेती वाहतूक करतांना मिळुन आल्याने आरोपी 1) मंगेश सावसाकळे रा. जमनापुर त. साकोली 2) कुलदिप राऊत रा. साकोली एकोळी यांना ताब्यात घेऊन कलम 303(2) 49भा.न.सा. सह कलम( 8) महा. मह. अधिनियम सह कलम 7,9 पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही

पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन लाखनी चे पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ,

पोहवा अमितेश वट्टेवार, पोसी, सचिन बुधे, स्वप्नील खालकर यांनी केली.



