क्राइम
तडीपाराचा उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगाराला अटक…

लाखांदूर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर पोलीस स्टेशन परिसरात स्था. गु. शा. भंडारा, उपविभाग पवनी पथक लाखांदूर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना तडीपार झालेला आरोपी श्रीराम नरेश प्रधान याला भंडारा जिल्ह्यातुन दोन महिन्याकरिता हद्दपार केले असतांना आरोपी ने आदेशाची अहवेलना करून नेहरु वार्ड लाखांदूर त्याच्या राहते घरी हजर मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनात पोहवा मस्के स्था. गु. शा. भंडारा यांनी केली असून पुढील तपास लाखांदूर पोलीस स्टेशन चे अधिकारी करीत आहेत.



