अबाधा फाऊंडेशन तुमसर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न…
■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■
तुमसर दि. 25 जून… स्थानिक अबाधा फाउंडेशन तुमसर च्या वतीने ‘अबाधा अभ्यास’ उपक्रमांतर्गत तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा “सत्कार सोहळा” संपन्न झाला. कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून मा. रविंद्र टी. वाघमारे (समुपदेशक युवा प्रेरणा व से. मुख्या.) लाभले तर प्रमुख वक्ते म्हणून मा. सुनील साळुंके (उपमुख्याधिकारी, न. प. तुमसर), मा. देवानंद सावके (प्रशासकीय अधिकारी, न. प. तुमसर) उपस्थित होते. तथा मा. संदिपजी ताले (उपाध्यक्ष, जि. प. भंडारा), मा. चंद्रशेखर (नंदू) रहांगडाले (सभापती, प. स. तुमसर), मा. हिरालाल नागपुरे (उपसभापती, प. स. तुमसर), प्रा.संजय लेनगुरे, न. प. नेहरू महा. तुमसर) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सत्कार सोहळ्यामध्ये संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या तुमसर व डोंगरी बु. केंद्रातील एस. एस. सी. व एच. एस. सी. परीक्षेत प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे व तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचे मेडल व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आले. लगेचच सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनी आपले अभिप्राय व्यक्त करून अबाधा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे अभिनंदन करून मा. माधुरीताई पटले (व्यवस्थापकीय संचालिका) यांचे आभार व्यक्त केले.अश्याप्रकारे कार्यक्रम संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका मा. माधुरीताई पटले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी वृंद यांनी सुरळीत पार पाडले.
स्वार्थी करमकर
न्यूज रिपोर्टर
पोलीस की आवाज
महिला प्रतिनिधी


पोलीस की आवाज डिजिटल वृत्तपत्र…उत्तम रित्या कार्य करीत असल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद…