युवकाच्या मृत्यू ने तुमसरात खळबळ…
पोलीस अधीक्षक यांनी घेतली धाव घटनास्थळी…
तुमसर वार्ता:-प्राप्त माहितीनुसार आंबेडकर नगर येथील एका युवकाचा संशयित मृत्यू झाल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. मृत्यक रोशन वासनिक हा दारुचा व्यसनी होता. माकडे नगर निवासी लारा किरण मारबदे यांच्या सोबत आपसात वाद झाल्याने खटाटोप झाली होती. घटनेनंतर काही तासाने रोशन चा मृत देह त्याच्या घरात आठळल्याने मृत वर संशय निर्माण झालेला आहे .
ह्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड , स्था. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलीकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण सयाम यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे पाठविण्यात आला. पोलीसांनी आरोपी लारा मारबते याला तातडीने ताब्यात घेतले.

पुढील तपास तुमसर पोलीस चे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड व त्यांचे कर्मचारी करीत आहेत.