सामाजिक
पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या संकल्पनेतून आरोग्य शिबीराचे आयोजन…
सिहोरा पोलीस स्टेशन ला शिबीराची सुरुवात…
भंडारा जिल्हा वार्ता:-सिहोरा पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी, होमगार्ड, अंमलदार व त्यांच्या कुंटुबाकरीता निशुल्क आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.

पोलीस विभाग नेहमी जनतेच्या कामासाठी नेहमी तत्पर राहतात त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन विविध आजारास बळी पडावा लागतो ह्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा व प्राथमिक आरोग्य केंद्र सिहोरा यांच्या सहकार्याने ह्या शिबीराचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये सर्व पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाने उत्साहाने सहभागी झाले आणि शारीरिक तपासण्या करून मोफत औषधीचे वाटप करण्यात आले.
ह्या आरोग्य शिबिरामध्ये पोलीस निरीक्षक विजय कसोधन, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे, पोलीस उपनिरीक्षक पटले कल्याण शाखा भंडारा यांनी विशेष सहकार्य केले.