जागर नशा मुक्ती अभियान
तुमसर पोलीस स्टेशन द्वारे कार्यक्रम संपन्न…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन तसेच अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर यांच्या मार्गदर्शनात जागर नशा मुक्ती अभियान राबविण्यात येत आहे.

तुमसर पोलीस स्टेशन च्या वतीने जागर नशा मुक्ती कार्यक्रम अंतर्गत जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, शारदा हायस्कूल चे विद्यार्थी व शिक्षक,

पोलीस पाटील, महिला दक्षता व शांतता समिती यांना नशा मुक्ती वर मार्गदर्शन करुन रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये शाळेतील 190 विद्यार्थी, शिक्षक, शिक्षीका, पोलीस स्टेशन चे ठाणेदार संजय गायकवाड व संपूर्ण पोलीस कर्मचारी आणि सर्व पोलीस पाटील रॅली मध्ये सहभागी होऊन जागर नशा मुक्ती अभियानाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
राष्ट्रगीत घेऊन रॅली चा समापन करण्यात आले.