सामाजिक
जागर नशा मुक्ती अभियान कार्यक्रम
ठानेदार विजय कशोधन यांचे मार्गदर्शन…
भंडारा जिल्हा वार्ता:- भंडारा जिल्हा पोलीस विभाग जागर नशा मुक्ती अभियाना च्या वतीने सिहोरा पोलीस स्टेशन येथे जागर नशा मुक्ती अभियानाचा कार्यक्रम राबविण्यात आला.

यामध्ये महाराष्ट्र स्कूल व आदर्श स्कूल ईथुन रॅली काढण्यात आली.ह्या रॅली मध्ये ७०० विद्यार्थी,संपुर्ण शिक्षक, पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी , कर्मचारी व सर्व पोलीस पाटील रॅली मध्ये सहभागी झाले.
रॅली पोलीस स्टेशन येथे पोहचल्यावर
पोलीस निरीक्षक विजय कशोधन

यांनी जागर नशा मुक्ती अभियानावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व राष्ट्रगीत घेऊन विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.