सामाजिक
तुमसर शहर मध्ये कावड यात्रा चा भारी उत्सवात आयोजन करण्यात आले.
पत्रकार डॉक्टर सुखदेव काटकर तुमसर तालुका प्रतिनिधी तुममर –
तालुक्यातील माडगी घाट वैनगंगा नदीच्या पात्रातून जल गंगा भरून तुमसरच्या बजाज नगरच्या शिव मंदिरामध्ये कावड यात्रा आणण्यात आली .श्री नमोस्तुते शिवाय महिला मंडळ बजाज नगर यांच्यातर्फे या कावड यात्रेच्या आयोजन करण्यात आले. नदीपात्रातून गंगाजल घेऊन ढोल ताशाच्या गजरात ही कावड यात्रा चा समारोह 1/8/2025 ला सकाळपासून माडगीघाट वैनगंगा नदी पात्र तुन सुरुवात झाली .भरपूर संख्येने महिला भगव्या रंगाच्या साडीच्या परिधान करून नाचत गाजत कावड यात्रा चे उत्सव करण्यात आले .हा उत्सव पाहून नागरिक चकित झाले. हर हर महादेव हरहर गंगेचे नारे लावून संपूर्णतः वातावरण भक्तिमय झाले .तुमसर शहरात कावड यात्रा पाहण्यासाठी लोकांचं जमावडा पहायला मिळाले.या कावड यात्रेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
