क्राइम
अवैध हात भट्टी दारु वर धडक कार्यवाही…
2,25,910 रुपयांचा मुद्देमाल जप्त…
Chandr जिल्हा वार्ता:- पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार मोहाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा मांडेश्वर शिवाऱ्यातील एका नाल्याजवळ अवैध हातभट्टी दारु काढून गोरखधंदा सुरू होता ह्या बाबीची माहिती मिळताच मोहाळी पोलीसांनी धाड मारताच आरोपी मारोती पसीने याला ताब्यात घेऊन तिथला साहित्य सडवा मोहफुल, प्लास्टिक पाईप, प्लास्टिक ड्रम, जर्मन करची, लोखंडी ड्रम असा एकुण २,२५,९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व मोहाळी पोलीस चे पोलीस निरीक्षक सुरेन्द्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई मालाधरे यांनी केली.
(बातमी सविस्तर वाचावी)




