क्राइम
अवैध हात भट्टी दारु वर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही…

साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत बोधरा शेत शिवारातील घटना.. .
भंडारा/साकोली वार्ता:-मिळालेल्या गुप्त माहिती नुसार साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोधरा शेत शिवाराजवळुन वाहणाऱ्या बोधरा नाल्याच्या काठावर आरोपी रितेश गेडाम रा. जांभळी सडक याच्या ताब्यातुन 10 प्लास्टिक पिशव्या मध्ये सडवा पोहफुल ज्याची अंदाजे किंमत 60,000/- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध कलम 65(फ) म. दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.




