भंडारा पोलीसांची गुन्हे आढावा बैठक …!

मा. नुरुल हसन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न…
भंडारा/दिघोरी वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील दिघोरी पोलीस स्टेशनला जिल्ह्यातील प्रलंबित गुन्हाचा तपास कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारी आढावा घेऊन सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने दिघोरी मापोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठक पार पडली. या बैठकीत तपासाची गती वाढवणे, भंडारा जिल्ह्याची सुरक्षा बळकट करण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सुचना देण्यात आली.

मा.पोलीस अधीक्षक नुरुल हसन साहेब यांच्या हस्ते नोव्हेंबर महिन्यातील गुन्ह्याचा तपास प्रतिबंधात्मक कार्यवाही आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक करण्यात आले.

आढावा बैठकीनंतर दिघोरी परिसरातील नागरिक व पोलीस पाटील यांच्या सी संवाद साधुन त्यांची बैठक घेतली तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून त्यांच्या समस्या चे समाधान करण्याचे आश्वासन दिले.



