जिल्हा
नाकाडोंगरी ते आष्टी लोभी रस्ता देतो मृत्यू ला आमंत्रण…

तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी पासुन आष्टी लोभी गावाकडे जाणाऱा रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत. ह्या रस्त्यावरुन वाहनाने चालणारा मनुष्यच नाही तर पायदळ चालणाऱ्या व्यक्ती चा सुध्दा जीव धोक्यात आहे.

ह्या मार्गाने महाराष्ट्र एस टी महामंडळाची बस फेरी सुरू असुन ह्या खड्यामय रस्त्यामुळे प्रवासी व शाळेत ये -जा करणारे विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग तुमसर ने तातडीने लक्ष देऊन रस्ता बांधकाम सुरु करण्याची गरज आहे.


