अवैध रेती तस्करीवर पोलीसांची कार्यवाही…

अड्याळ व करडी वार्ता :-भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस स्टेशन चे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना मौजा गोसे टी पांईट जवळ स्वराज कंपनी चा ट्रक्टर बिना क्रमांकाच्या ट्रालमध्ये बिना पास परवाना अवैध रेती चोरी करताना मिळुन आल्याने आरोपी सुभम गायमुखे याच्या ताब्यातुन रेती भरलेला ट्रक व ट्राली अंदाजे किंमत 8 लाख 56000 रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच करडी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस स्टेशन चे ठाणेदार पेट्रोलिंग करीत असताना प्राथमिक आरोग्य केन्द्र करडी जवळ ऊभे असताना तिरोडा वरुन नवेझरी मार्गावर बिना नंबर च्या टीप्पर च्या प्रकार बिना रॉयल्टी ने अवैध रीतीने रेती वाहतूक करतांना मिळुन आल्याने आरोपी चालक आशिष बांडेबुचे मालक आकाश बांते याच्या ताब्यातुन 12 चक्का टीप्पर व 10 ब्रास रेती मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन ,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात अड्याळ पोलीस स्टेशन चे ठाणेदार धनंजय पाटील तसेच करडी पोलीस स्टेशन चे ठाणेदार नागलोत व त्यांचे सहकारी कर्मचारी करीत आहेत.



