शालेय

बुटी विद्यालयात दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

तुमसर वार्ता:-विद्यार्थ्यांनी कौशल्य व संस्कार अंगीकारावे: सुधीर पाठक माँयल प्रबंधक डोंगरी बुजुर्ग खान तुमसर तालुक्यातील बुटी विद्यालय गोबरवाही येथे दि 4 व 5 नोव्हेंबरला दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. उद्घाटक मा. सुधीर पाठक माँयल मॅनेजर डोंगरी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करावे व सध्याच्या घडीला विद्यार्थ्यांमध्ये संस्काराचा अभाव असल्याने विद्यार्थी संस्कारमय घडावा अशी इच्छा व्यक्त केली. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य कृष्णकांत बघेल होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे विश्वस्त कुंडलिक पवनकर,सदाशिव किनारकर, ठाणेदार शरद शेवाळे, उपसरपंच देवेंद्र अवथरे, केंद्रप्रमुख मुनिराज घुगे, राजेश पालीवाल, दर्शन वाधवाणी, मुरली पवनकर होते.

प्रस्तावनेतून शाळेची यशस्वी वाटचाल यावर मुख्याध्यापक जितेंद्र चिरवतकर यांनी प्रकाश टाकला.

सांस्कृतिक कार्यक्रमात वर्ग पाच ते दहा च्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती सामाजिक, राजकीय, महिला बाल अत्याचार इत्यादी ज्वलंत विषयावर एकूण 40 विविध
नृत्यकला तथा नाटकातून प्रेक्षक व पाहुण्यांचे मने जिंकली.

शाळेच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
दि.5 नोव्हेंबरला परिसरातील
शाळा मुख्याध्यापकाच्या हस्ते क्रीडा व सांस्कृतिक मध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना मेडल व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. व सर्वांसाठी स्नेहभोज आयोजित करण्यात आला होता.

यशस्वी आयोजन शिक्षक वैशाली हटवार, राजेश उके, अनिल आष्टनकर, पंजाब राठोड तेजबहादूर यादव, मनोज वरखडे, लक्ष्मी मते, सुरेश बोंद्रे, देवेंद्र लेंडे, ज्योती लांजेवार, सिमरन चौधरी, शिपाई परमेश्वर देशमुख शाळा नायक तुषार तरारे प्रांसु पुष्पतोडे, कुणाल समरगडे हर्ष मसराम, देवयानी बारागावणे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button