शालेय
भारत मुक्ती मोर्चा व भारतीय विद्यार्थी मोर्चा संघटन यांच्या वतीने निवेदन…
नाकाडोंगरी वार्ता:-नाकाडोंगरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्युत पुरवठा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचण निर्माण होत आहे.
वर्तमान काळात भरपूर उष्णता भरपूर असल्यामुळे विद्यार्थ्यांना विद्या अर्जन करण्यामध्ये शाळेत अडचण निर्माण होत आहे. यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा संघटन व भारत मुक्ती मोर्चा संघटन चे पदाधिकारी गौतम नंदागवळी व शुभम गजभिये यांनी ग्रामपंचायत ला निवेदन दिले.
ग्रामपंचायत नाकाडोंगरी ने त्या पत्राच्या अनुषंगाने मासिक सभेत ठरविण्यात आले की मौजा जि. प. बुनियादी शाळेमध्ये ग्रामपंचायत चा सुरू असलेल्या विद्युत मिटर वरुन शाळेला विद्युत पुरवठा करण्यात आले.
