राज्य
विभागीय वन अधिकाऱ्याकडून रोपवाटिकेतील 26000 रोपटे नष्ट झाल्याची चौकशी…
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील डोंगरला येथील मोठ्या प्रमाणात रोपवाटिकेत 26000 रोपटे नष्ट झाल्याची घटना घडली अशी तक्रार शिवसेना उबाठा चे विभाग प्रमुख अमित मेश्राम यांनी वनविभागाला मौका स्थळी उपस्थित राहून पहानी करावे असे पत्राद्वारे कळविले.

ह्या घटनेची गांभीर्याने दखल घेत वन अधिकारी यांना तातडीने चौकशी चे आदेश दिले. यावर चन्द्रपुर विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण बी. एस. ऐडे यांनी मौका चौकशी केली त्यावेळी सामाजिक वनीकरण तुमसर चे अधिकारी, स्विय सहाय्यक तिवारी आमदार राजु कारेमोरे,कैलास जोशी, तक्रारदार अमित मेश्राम, पत्रकार राजेश ऊके हे उपस्थित होते.



