राज्य
नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस दलाकडून रुट मार्च…

भंडारा वार्ता:-
भंडारा नगरपालिका च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडनुक प्रकिया शांततेने व पारदर्शक पणे पार पडावी तसेच निवडणुकीमध्ये कोणत्याही समाजकंटकांकडून कोणताही अनुचित प्रकरण घडून कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये ह्या उद्देशाने भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे भंडारा शहरातील महत्वाच्या चौकातून रुट मार्च काढण्यात आले या रुट मार्च मध्ये भंडारा जिल्हाधिकारी सावनकुमार, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत

शक्ती प्रदर्शनाद्वारे प्रशासनाची सज्जता दाखविण्यात आली. ह्या रुट मार्च मध्ये 11 पोलीस अधिकारी, 145 पोलीस अंमलदार, 100 होमगार्ड जवान, राज्य राखीव पोलीस दलाचे 42 अंमलदार आणि RCP पथक क्रमांक 1 चे 20 अंमलदार असा मोठा ताफा सहभागी झाला.




