रेती तस्करी करणाऱ्या विरुद्ध “ऑपरेशन १०० कोटी “

शासनाचा अभियान यशस्वी
भंडारा जिल्हा वार्ता:-मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध रेती उपसा तस्करी करणाऱ्या माफिया विरुद्ध भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन १०० कोटी यशस्वी पणे राबविण्यात आले. ऑगस्ट २४ ते सप्टेंबर २५ च्या कालावधीत १०० कोटी पेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ६४३ गुन्हांची नोंद करण्यात आली. तसेच १२०० पेक्षा अधिक आरोपींना कायद्याच्या चौकटीत बसवून कार्यवाही करण्यात आली. पोलिसांकडून जप्ती झालेल्या लाखो टन अवैध रेती साठा व मालमत्तेची किंमत १०० कोटी पेक्षा जास्त झाली आहे. भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यवाही ची सराहना
मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस, महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे, केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी ,भंडारा जिल्ह्याचे पालक मंत्री पंकज भोयर तसेच विधानपरिषदेचे सदस्य परीणय फुके यांनी केली.
मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन साहेबांनी भंडारा जिल्हात होणाऱ्या अनेक अवैध धंद्यावर अंकुश लावले.
भंडारा विभागात २५२ गुन्हे आणि ४३.०६ तर तुमसर विभागात १४४ गुन्हे आणि २३.३६ कोटी जप्त झाले. प्रत्येक पोलीस स्टेशन येथे विशेष गुप्तचर पथक स्थापन केले आहे.
ह्या सर्व प्रकारच्या कार्यवाही मुळे ” पोलीस अधीक्षक नुरुल हसन” ठरले भंडारा जिल्ह्याचे सिंगम!



