अवैध रेती तस्करीवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची मोठी कार्यवाही…

साकोली पोलीस स्टेशन ची घटना…
साकोली वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहिती नुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार मौजा परसोडी मेळघाट चुलबंद नदी पात्रातुन अवैधरित्या रेती चोरी सुरू असल्याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पथक पोहचताच घटनास्थळावरून ७ ट्रक्टर व चालक मालक मिळुन आले पोलीसांना पाहताच ट्रक्टर चालकाने रेती भरलेले ट्रक्टर रेती घाटातच खाली करुन पळून जाण्याच्या तयारीत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांच्या पथकाने त्यांचा घेराव करुन ताब्यात घेतले.
घटना स्थळावरुन आरोपी च्या ताब्यातून ७ ट्रक्टर ११ मोबाईल १८ प्लास्टिक घमेले, १४ लोखंडी फावडे असे एकूण ५६ लाख ६५ हजार ३०० रु. चा मुद्देमाल जप्त करुन चालक मालक आरोपी विरुद्ध कोणतीही परवानगी न घेता चुलबंद नदी पात्रातुन रेती चोरी करतांना मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध कलम ३०५(ई) ४९ भा. न्या. स. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही
पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात साकोली चे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे
व साकोली पोलीस स्टेशन चे अधिकारी यांनी केली.(अशा कार्यवाही जास्त प्रमाणात होणे काळाची गरज आहे )



