जिल्हा
एस. टी. भंडारा येथे अल्कोहोल तपासणी मोहीम यशस्वी

भंडारा वार्ता:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भंडारा विभाग च्या भंडारा आगारात दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोज मंगळवार ला सुरक्षा व दक्षता अधिकारी , खाते प्रमुख तसेच उपमुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी ह्याच्या आदेशानुसार सुरक्षा व दक्षता अधिकारी मोहन कानफाडे, सुरक्षा पर्यवेक्षक अजिंक्य रहांगडाले , सुरक्षा कर्मचारी यांनी भंडारा आगारातील चालक – वाहक आणि यांत्रिक कर्मचारी यांच्या मद्यपान तपासणी तथा अल्कोहोल तपासणी करण्यात आली.
त्यात चालक १४ ,
वाहक १२ , यांत्रिक कर्मचारी ०९ यांची तपासणी करण्यात आली. प्रसंगी तपासणी दरम्यान प्रमुख कारागीर प्र.भ. चौरे हे मद्यप्राशन करून आढळून आले.



