तुमसर येथे आगार प्रमुखांना बस फेरीत वाढ करण्यासाठी निवेदन…
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील राजापूर गावात जवळपास संभर विद्यार्थी दररोज वेगवेगळ्या विद्यालयात तुमसर, मोहाळी, भंडारा शिक्षण घेण्यासाठी जात येत असतात या मार्गावरील बावनथडी ते तुमसर व घानोड बस जाते परंतु या मार्गावर प्रवाशी आणि विद्यार्थी यांची वर्दळ असते. विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात पडत असतो. ह्या सर्व परीस्थिती पासून त्रासुन विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी तुमसर ते घानोड बावनथडी बस अडवली तसेच जोपर्यंत ह्या दुसरी बस फेरी सुरू होत नाही तोपर्यंत बस सोडनार नाही असे विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी हट्ट धरले. ही घटना घडताच घटना स्थळी गोबरवाही पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांनी स्वत: येऊन परीस्थिती जाणून घेतली आणि विद्यार्थ्यांना समजूत घालून मी स्वतः तुमसर आग्रा सी बोलनी करतो असे सांगितल्याने बस सोडण्यात आली.
राजापूर ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच महाप्रकाश परबते, शितेश नोनारे, रामलाल बिटलाये,विजेश सलाम, यांनी तुमसर आगार प्रमुख यांना बस फेरीत वाढ करण्यासाठी निवेदन देण्यात आले.



