BAMS डॉक्टर च्या कार्याचे झाले कौतुक…
जनतेने आरोग्य वर्धनी नाकाडोंगरी केन्द्राची डॉक्टरांची केली प्रशंसा…
नाकाडोंगरी वार्ता:-तुमसर तालुक्यात नाकाडोंगरी हा गाव महाराष्ट्रातील शेवटच्या टोकावर आहे . नाकाडोंगरी येथील आरोग्य वर्धनी केन्द्रामध्ये योग्य उपचार होत असल्याने आजुबाजूच्या परीसरातील रुग्णांना उपचार घेण्यासाठी वाढ झाल्याचे दिसून येते. आरोग्य केन्द्र नाकाडोंगरी येथे वर्तमान बीएएमएस ड्रॉक्टरांच्या फायदा मिळत असल्याने उपचार चांगल्याप्रकारे होत असल्याची प्रशंसा रुग्णांनी केली आहे.
नाकाडोंगरी आरोग्य वर्धनी केन्द्रा अंतर्गत सुमारे 25 ते 30 गावाचा समावेश असुन दररोज मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील रुग्ण मोठ्या संख्येने दवाखान्यात जाऊन उपचार घेत आहेत.
बी ए एम एस डॉक्टर रुजू झाल्यापासून दवाखान्यात ओपीडी वेळ सकाळी 8.30 वाजेपासून सुरु होत असते तसेच 24 तास सेवा दिली जाते.
मा. जिल्हाधिकारी सांवनकुमार यांनी कार्यक्रमा निमित्ताने आरोग्य वर्धनी नाकाडोंगरी ला भेट दिली असता डॉक्टरांनी केले व सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केल्याची चर्चा संपूर्ण परीसरात सुरु आहे.
