“स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियान संपन्न…

नाकाडोंगरी वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे केन्द्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या वतीने स्वस्थ नारी , सशक्त परिवार अभियान पार पडले. या अभियानामध्ये 275 रुग्नाची तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये मधुमेह, नेत्ररोग, स्तन व गर्भाशय कर्करोग, मुखरोग, गरोदर महिलांची तपासणी, सिकलसेल तपासणी, क्षय रोग, हिमोग्लोबिन, लसीकरण सेवा व किशोरवयीन मुलींची तपासणी व मार्गदर्शन करण्यात आते.

ह्या अभियान कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष जि. प. सदस्य राजुभाऊ देशभ्रतार प्रमुख पाहुणे सुमित गौपाले सरपंच नाकाडोंगरी, निरंजन गौपाले सदस्य ग्रा. प. यांची उपस्थित प्रामुख्याने होती.

या अभियात
प्राथमिक आरोग्य केंद्र नाकाडोंगरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी घरडे, डॉ. सत्यम निंबेकर
यांची उपस्थित होती. तसेच डॉ. गोंधुळे बालरोगतज्ज्ञ, डॉ. वैशाली ढोके स्थित रोग तज्ञ, डॉ. अनुराधा हिवर्डे नेत्ररोग तज्ञ, डॉ. नंदागवळी दंतरोग तज्ञ ह्या विशेष उपस्थिती होती. या अभियानात आयुष्यमान कार्ड बनविण्यात आले. यामध्ये HA, LHV, ANM, MPW गटप्रवर्तक सर्व आशा व प्राथमिक आरोग्य केन्द्रातिल सर्व कर्मचारी उपस्थित होते.
