क्राइम
जुगार♦♣♥♠ अड्यावर पोलीसांची धाड…

आंधळगाव वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीत आंधळगाव मध्ये तासपत्ती हारजित चा खेळत असल्याची मिळालेल्या माहितीवरून आंधळगाव पोलीसांनी जुगार अड्यावर रेड केली असता एकुण सात आरोपी मिळुन आले. आरोपींचा तपास घेतला असता त्यांच्या कडून मोबाईल फोन काही नगदी रुपये असे एकूण 63,650 रुपयांचा माल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध कलम 12( अ) महा. जुका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
आंधळगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नितीन राठोड, पोलीस उपनिरीक्षक अनिल गेडाम, पोहवा श्रीकांत पुडके, पोशि मलधाम, सार्वे, बंसोड, उईके, लांजेवार व पोलीस स्टेशन आंधळगाव चे कर्मचारी करीत आहेत.




