क्राइम
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ईसमास 20 वर्षाचा कारावास…

अड्याळ वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत 2020 मध्ये घडलेल्या घटनेनुसार फिर्यादी ची अल्पवयीन घरात एकटीच असल्याने सुना डाव पाहून आरोपी निखिल उर्फ काल्या छोटु बावने रा. मोरगाव ता. मौदा जि. नागपूर याने घरात जाऊन दरवाजा बंद केले आणि पिडीताचे जबरदस्तीने अत्याचार करुन तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादी विवाहित महिला रा. भावळ यांच्या तोंडी तक्रारी वरुन अड्याळ पोलीस येथे अप क्रं. 209/2020 कलम 376(3) 506 भादंवि RW 4, 6 पोस्को अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर घटना घडताच गुन्ह्याचा तपास महिला सपोनि. भाग्यश्री कुलकर्णी यांनी तात्काळ घटना स्थळी जाऊन तपासाला सुरुवात करण्यात आली. प्राथमिक तपास पंचासमक्ष घेऊन साक्षीदार यांना विचारपुस करुन आरोपी ला अटक करुन न्यायालयात दाखल केले. जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीसाची नियुक्ती करुन पोस्को अंतर्गत कलम 4 पोस्को भादवि मध्ये 20 वर्ष कारावास शिक्षा व 15,000 रुपयांची द्रव्य दंडाची शिक्षा दिलेली आहे.
सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, अड्याळ पोलीस स्टेशन चे ठाणेदार धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनात पोहवा सुरेश भगत पोलीस स्टेशन अड्याळ यांनी कोर्ट पैरवी म्हणून कामकाज केले.



