अवैध रेती वाहतूकीवर कार्यवाही…

कारधा पोलीसांची कामगिरी…
कारधा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशन चे कर्मचारी रात्र गस्त पेट्रोलिंग करीत असतांना मौजा सालेबर्डी शिवारात1) बारा चक्का टाटा कंपनी चा टीप्पर चालक नितेश वरकडे रा. दिघोरी , 2) बारा चक्का टाटा कंपनी चा टीप्पर चालक नरेश डोंगरावर रा. कोंडी जवाहरनगर यांच्या ताब्यातील टीप्पर मध्ये रेती वाहतूक करतांना दिसून आल्याने टीप्पर चालकाला थांबवुन रेती वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्यांच्या कडे रेती वाहतूकीचा कुठलाही परवाना नसल्याचे सांगितल्या ने आरोपी कडून दोन्ही रेती भरलेले टीप्पर ज्याची अंदाजे किंमत 60,72000/-रुपयांचा मिळुन आल्याने त्यांच्या विरुद्ध कलम 303(2) भा. न्या. स. सहकलम 49 जमीन महसूल अधि. 7,9 पर्यावरण संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही

पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, कारधा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी
यांच्या मार्गदर्शनात पोहवा धावडे, पोहवा डोंगरे व पोलीस स्टेशन कारधा चे अधिकारी करीत आहेत.



