पोलीस विभागाकडून रक्तदान…
पोलीस अधीक्षक नुरुल हसन साहेब यांच्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात रुग्णांना रक्त पिसव्याचा साठा कमी होत असल्याने रुग्णांना रक्त पुरविण्यात अडचण निर्माण होत होती त्यामुळे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी डॉ. दिपचंद सोयाम सिव्हिल सर्जन जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या सोबत भेट घेऊन आणि वाढदिवसाच्या निमित्ताने पोलीस दलातील व्यस्त कार्यप्रणाली मधुन वेळ काढून बहुउद्देशीय सभागृह पोलीस मुख्यालय भंडारा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस पाटील, युथ फोरम, पोलीस बाय संघटना, कार्यालयातील मंत्रालयीन कर्मचारी यांच्या सहकार्याने एकुण 113 रक्त पिशव्या संकलित करुन जिल्हा सामान्य रुग्णालयात जमा करण्यात आले.

ह्या शिबिरातपोलीस अधीक्षक नुरुल हसन साहेब स्वत:रक्तदान केले आणि त्यांच्या पत्नी हसन मॅडम तसेच अपर पोलीस अधीक्षक नितीन मोरे साहेब उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक मा.नुरुल हसन साहेबांनी समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्याच्या रक्तदान शिबीर कार्यक्रमा बद्दल अभिनंदन केले.