पोलीसांची जुगार अड्यावर धाड
उमरवाडा सागवनवाडीतिल घटना
डॉ. सुखदेव काटकर विशेष प्रतिनिधी (पोलीस कि आवाज)
तुमसर वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार तुमसर पोलीस स्टेशन चे कर्मचारी पोउपनी सयान,बावने ,गिरीपुंजे,नितनवरे,दमाहे,फेंडर हे सर्व मौजा उमरवाडा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उमरवाडा ते सितेपार जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला सागवननर्सरी मध्ये सार्वजनिक ठिकाणी चालू असलेल्या जुगार अड्यावर धाड मारुन बारा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जुगार अड्यावरुन 3 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चेतन सार्वे तुमसर, संतोष लिल्हारे देव्हाळी, शाहिल वैद्य हसारा, स्वप्नील कुमरे तुमसर, विक्रम रावलानी तुमसर, संजय साठवने तुमसर, असे मिळून आले व
काही आरोपी पसार झाले. फरार आरोपी आकाश महालगावे तुमसर, योगेश गायधने तुमसर, धर्मेंद्र बनकर उमरवाडा, साहील धकाते तुमसर, संदीप ठाकरे तुमसर, ईमरान शेख तुमसर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आले.

सदर गुन्ह्याची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन , अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी व पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण सयाम व डीबी पथक तुमसर करत आहे.



