चांपा हळदगाव परसोडी खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा.

धम्मपाल बौध्द जवाहरनगर (पेट्रोलपंप)
- दुचाकी चालकाची जीव धोक्यात*
उमरेड: पावसाळ्याची सुरुवात होताच चांपा हळदगाव परसोडी परिसरातून जाणारा रस्ता धोकादायक बनला आहे.
खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने दुचाकी स्वारांना अंदाज न आल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. चांपा, हळदगाव, परसोडी 5 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे पडले आहेत. काही खड्डे दोन ते तीन फूट लांब आणि दीड एक दीड फोन असून पावसामुळे त्यात पाणी साचले आहे रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशामुळे दुचाकी स्वरांना खड्ड्याचा अंदाज घेत नाही त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
उमरेड तालुक्यातील रस्त्याची अवस्था बिकट आहे . पावसाळ्यापूर्वी मुरूम तस्करी आणि त्यानंतर जड वाहनाची वाहतूक यामुळे या रस्त्यांची अधोगती झाली आहे आता या रस्त्यावरून प्रवास करताना मोठा धोका निर्माण झाला आहे. वाढते खड्डे आणि अपघाताची शक्यता पाहता हा रस्ता वाहन चालकासाठी डोकेदुखी ठरत आहे .

परसोडी व हळदगाव येथील शाळकरी विद्यार्थी दररोज चांपा येथे शिक्षण घेण्यासाठी सायकलने शाळेत येतात तेव्हा त्यांना सायकल चालवायची कशी असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. ह्या रस्त्याने जीवित हानी होऊ शकतो प्रशासनांनी याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
अपघातांना निमंत्रण देण्याचा प्रकार
चांपा ते हळदगाव, परसोडी या गावांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. हा रस्ता प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण बनला आहे.
हा रस्ता आता केवळ खड्ड्याचा अड्डा बनला आहे व रस्त्यावर डांबर आणि भेटीचा केवळ नाममात्र अवशेष शिल्लक आहे या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीवाला धोका आहे असा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
चांपा ते हळदगाव परसोडी या तीन महत्त्वपूर्ण गावांना जोडणारा हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा आहे. असा प्रश्न दुचाकी स्वार , वाहन चालक व प्रवाशांना पडला आहे.
दररोज या धोकादायक रस्त्यावरून प्रवास करताना अपघाताची भीती आहे. गिट्टिचा वापर करून हा रस्ता बांधण्यात आला होता.
रस्ता पूर्णपणे उखडला असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यामध्ये पाणी साचत असल्याने दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांना अंदाज घेणे कठीण होते त्यामुळे अनेक अपघात घडतात खड्ड्यातील घाण पाणी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या कपड्यावर उडते त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो . रस्ता एकेरी असल्यामुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर झाली आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी थांबून राहावे लागते. प्रवासाला अधिक वेळ लागतो आणि नागरिकांचा मूल्यवान वेळ वाया जातो.
या रस्त्याचा वापर मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी करतात काही पालक स्वतःच्या वाहनांनी मुलांना शाळेत सोडतात. तर काही साठी शाळेच्या बसची व्यवस्था आहे मात्र रस्त्याची दयनीय अवस्था आणि खड्ड्यामुळे बस चालकांना मोठी कसरत करावी लागते. या परिस्थितीत बस सेवा बंद पडल्यास अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे .
*या रस्ता बांधकामासाठी परसोडी गावकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करून मागणी केली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आता जनतेसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.
अश्विन ऊके, माजी सरपंच परसोडी तालुका उमरेड
*या रस्त्यावरून विविध गावातील विद्यार्थी आणि नागरिक येजा करतात
अपघाताचे प्रमाण नित्याचे झाले आहे. मात्र शासन आणि प्रशासन झोपल्या अवस्थेत आहे.



