राजापुरात सागवान झाडाची कत्तल…
आरोपी फरार
भंडारा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वन परिक्षेत्रात येणाऱ्या राजापूर गावात राखीव जंगलात गट. क्र. १०९ कुंपण क्र. ६ ह्या भागात जंगलातील १८ (अठरा) सागवान झाळे मशिनच्या साहाय्याने अवैध झाडाची कत्तल झाल्याचे धक्कादायक प्रकार घडला. माहिती पडताच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी आपला ताफा घेऊन घटना स्थळी पोहचुन चौकशी करुन अठरा झाडाची🌳कत्तल झाल्याचे आढळून आले.
वन अधिकाऱ्यांनी घटना स्थळाचा पंचनामा करुन झालेले कत्तल झालेले वृक्ष ताब्यात घेतले .
प्राथमिक चौकशीत एका महिलेचा बयान घेण्यात आला. ह्या चौकशी त अजुनही काही व्यक्ती चा समावेश असल्याचे समोर येत आहे.
सागवान हे झाड अतिशय मौल्यवान असुन ह्या झाडाची जास्त प्रमाणात मांग आहे.
पर्यावरण प्रेमी व ग्रामस्थांनी ह्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
ह्या घटनेची माहिती पोलीस विभागाला सुध्दा देण्यात आली. आरोपी अजून पर्यंत फरार असल्याचे बोलले जात आहे. फरार आरोपी चा शोध वन अधिकारी व पोलीस घेत असल्याची माहिती मिळाली आहे.



